कोणीतरी तुमच्या केसांचं अनपेक्षितपणे फार कौतुक केलं आणि त्यानंतर तुमचे केस भयंकर गळायला लागले…असं कधी तुमच्यासोबत झालंय? याला म्हणतात दृष्ट लागणं. हे झालं एक उदाहरण, अशी अनेक उदाहरणं कदाचित तुम्ही अनुभवली असतील.
परंतु आपल्याला दृष्ट लागलीये हे अचूक ओळखताच येत नाही, त्यामुळे त्यावर योग्य वेळी उपायही करणं शक्य होत नाही. आज आपण याबाबत ज्योतिषी काय सांगतात जाणून घेणार आहोत.
झारखंडमधील ज्योतिषी संतोष कुमार चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दृष्ट लागण्याचं सर्वात मोठं कारण असतं कुंडलीत चंद्राचं स्थान कमकुवत असणं. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्राचं स्थान भक्कम नसतं त्या व्यक्तीला लगेच दृष्ट लागते. शिवाय जर राहूची स्थिती व्यवस्थित नसेल तरीसुद्धा दृष्ट लागू शकते. दृष्ट लागण्यास आपलं शरीर आपल्याला संकेत देतं.
ज्योतिषी सांगतात की, आळस येणं सामान्य आहे. परंतु दृष्ट लागल्यास शरिरात प्रचंड आळस संचारतो. सकाळी झोपेतून उठावंसच वाटत नाही आणि जरी उठलो तरी ब्रश करावंस वाटत नाही. ती व्यक्ती तासनतास लोळत पडते. अनेकदा असं होतं की, कोणत्याही कार्यात कितीही मेहनत केली तरी यश काही मिळत नाही. सतत अडचणींमागून अडचणी येतात. अगदी सोपं वाटणारं ते काम फार कठीण होऊन बसतं, अशावेळी समजून जायचं की आपल्याला कोणाचीतरी दृष्ट लागलीये.
ज्योतिशास्त्रानुसार, चौकाला राहूचं ठिकाण मानतात. म्हणून चौकात किंवा जिथं चार रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी जास्त वेळ थांबू नये. घरातून बाहेर पडताना कधीच दूध पिऊ नये किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ खाऊ नये. यामुळे कुंडलीत चंद्राचं स्थान कमकुवत होऊन दृष्ट लागण्याची शक्यता वाढते.
उपाय काय?
आंघोळीच्या पाण्यात मीठ घालावं. त्यामुळे आपल्यातली सकारात्मक ऊर्जा वाढते आणि ती दृष्ट लागल्यास त्यावर भारी पडू शकते. हनुमान चालिसेचं पठण करणंही फायदेशीर ठरू शकतं. शिवाय लाल रंगाचे कपडे दान करावे. पिंपळ्याच्या वृक्षाभोवती फेऱ्या मारल्यानेही सकारात्मक ऊर्जा प्रचंड वाढते आणि दृष्ट लागण्याची शक्यता कमी होते.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. hellobuldana त्याची हमी देत नाही.