spot_img
spot_img

डोणगावात NCMC स्मार्ट कार्ड केंद्राचे थाटात उद्घाटन; प्रवाशांना आता गावातच मिळणार डिजिटल प्रवासाची सुविधा!

डोणगाव (हॅलो बुलढाणा / अनिल राठोड) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून डोणगाव येथे प्रवाशांसाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. १ जून २०२६ रोजी ‘आदर्श आपले सरकार सेवा केंद्र’, डोणगाव येथे एसटी महामंडळाच्या अधिकृत NCMC स्मार्ट कार्ड केंद्राचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामुळे डोणगावसह परिसरातील प्रवाशांना आता स्मार्ट कार्डसाठी शहरात धाव घेण्याची गरज उरणार नाही.

या केंद्राचे उद्घाटन डोणगाव बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक भोसले साहेब यांच्या शुभहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहकर पंचायत समितीचे माजी सभापती निंबाजी पांडव होते. यावेळी ॲड. सदार, दीपक गायकवाड, ज्येष्ठ नागरिक नागोजी आखरे, गजानन आखाडे, धनंजय वाघ, गजानन बोंद्रे, रामेश्वर पाटील यांच्यासह महिला व पुरुष लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एसटी प्रवास अधिक हायटेक, सोयीस्कर आणि डिजिटल करण्याच्या दिशेने हे केंद्र महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. ‘आदर्श आपले सरकार सेवा केंद्र’चे संचालक अमोल ठाकरे यांनी नागरिकांना या सुविधेची माहिती देत महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि नियमित प्रवाशांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!