बुलढाणा (हॅलो बुलढाणा) सागवान ग्राम पंचायत इतिहासात प्रथमच अविरोध झाली असून,आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात ते अविरोध झाले आहेत.
देवा दांडगे सागवान ग्राम पंचायत सरपंच पदी अविरोध झाल्याने त्यांच्या निवडीचा मोठा जल्लोष करण्यात आला.दरम्यान रेंगाळत असलेले गावातील अनेक प्रश्न मार्गी लावणार..पारदर्शीपणे कार्य करणार..भ्रष्टाचार होऊ देणार नाही..आमदार संजय गायकवाड यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असे देवा दांडगे यांनी आश्वासित केले.
यावेळी सर्व ग्राम पंचायत सदस्य,कर्मचारी वृंद व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.