बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज आक्रोश मोर्चाचे एका सभेत रूपांतर झाल्यावर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे विविध समस्यांना घेऊन नाव न घेता स्थानिक आमदार यांच्यावर जोरदार बरसले.
अंबादास दानवे म्हणाले की सरकार झोपेत असून बहिणींचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.परंतु हे त्रिकूट सरकार सरकारी खर्चाने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दीड हजार रुपये देऊन एक प्रकारे इव्हेंट साजरा करत आहे.लाडक्या बहिणी यांच्यावर अत्याचार होत असेल तर त्या या सरकारच्या लाडक्या बहिणी आहेत का ?असा प्रश्न उपस्थित करून ते पुढे म्हणाले की आमच्या लाडक्या बहिणी स्वाभिमानी आहेत .राष्ट्रमाता जिजाऊंच्या सावित्रीच्या लेकी आहेत.एखादा वाचाळ वीर काही पण बोलतो ..मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.त्यांचे विविध प्रश्न उदाहरणार्थ सिंचन,बेरोजगारी अशा प्रश्नांवर बोलता येत नाही.केवळ पुतळे उभारून रोजगार मिळणार नाही. हे मिंदे सरकार अपयशी ठरले असून जनता यांना आपली जागा दाखवून देणार असल्याचे दानवे म्हणाले.