बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नुकत्याच बेंगलोर येथे सीबीएससी साउथ झोनच्या योगासन स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत बुलढाण्याच्या पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी क्षितिज वैशाली गजेंद्र निकम याने योगासन स्पर्धेत 14 वर्षे खालील गटात भाग घेऊन यश संपादन केले. त्याची राष्ट्रीय स्तरावर होणार्या सीबीएससी विद्यार्थ्यांच्या स्पर्धेत निवड झाली.
क्षितिजिने आतापर्यंत अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले असून तो एक उत्कृष्ट योग पटू आहे. 3 ते 5 आक्टोंबर यादरम्यान सुरत येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेत तो महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहे. रुपेश मयेकर मुंबई, विष्णू चक्रवर्ती संगमनेरम प्रशांत सुरनार मेहकर,नॄत्य प्रशिक्षक अमोल जामदार ,राष्ट्रीय योगा कोच डॉ. वैशाली निकम यांच्या मार्गदर्शनाखाली क्षितिज योग प्रशिक्षण घेत असून त्यांनी केलेल्या अमूल्य मार्गदर्शनामुळेच क्षितिज आपल्या योगाचे उत्कृष्ट प्रदर्शन साउथ झोन मध्ये करू शकला व त्याची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली . बुलढाण्यात झालेल्या एका कार्यक्रमात केंद्रीय आयुष राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव यांनी क्षितिजचे योग प्रात्यक्षिक पाहून क्षितिज एक दिवस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू होईल अशा शुभेच्छा दिल्या होत्या. त्याच अनुषंगाने क्षितीजने लवकरच हे यश मिळवून तो राष्ट्रीय स्तरावर आपल्या योगाचे प्रात्यक्षिक करणार आहे. याबद्दल नामदार प्रतापराव जाधव, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड, पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्रिन्सिपल अजय इंगळे,क्रीडा विश्वजीत देशमुख शिक्षक विश्वजीत देशमुख ,जिल्हा क्रीडा अधिकारी बी एस महानकर यांचेसह बुलढाण्यातील क्रीडाप्रेमी मान्यवरांनी क्षितीजचे अभिनंदन केले.