spot_img
spot_img

“काम सरो वैद्य मरो!” -‘लाडक्या बहिणींच्या’ कार्यक्रमानंतर ‘लाडक्या चिमुकल्या’ त्या खड्ड्यांमुळे धोक्यात !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नुकताच मुख्यमंत्र्यांचा जंगी कार्यक्रम आटोपला आणि तहसील चौक ते एचडीएफसी चौकादरम्यान रहदारीमुळे एका शाळेसमोरील बुजविलेला खड्डा उखडल्याने एक नर्सरीची चिमुकली सदर खड्ड्यात पडल्याने आज दुखापतग्रस्त झाली आहे.सदर खड्डा अपघाताला आमंत्रण देणारा ठरत असून हा खड्डा कोण बुजविणार ?असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते व विशेष मानसेवी पोलीस अधिकारी प्रभाकर वाघमारे यांनी उपस्थित केला आहे.

शहरातील रस्ते गुळगुळीत होणार असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आश्वासित केले असले तरी,सध्या रस्त्यांची परिस्थिती खड्डेमय आहे.नुकताच मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.शेकडो गाड्या रस्त्यावरून धावल्या.दरम्यान तहसील चौक ते एचडीएफसी चौक दरम्यान वरील एका शाळेच्या समोरील विशेष मानसेवी पोलीस अधिकारी प्रभाकर वाघमारे यांनी सिमेंटने बुजविलेला खड्डा उघडा पडला. आज या खड्ड्यामध्ये एक नर्सरीची चिमुकली मुलगी पडल्याने तिला दुखापत झाली आहे.हा पडलेला खड्डा व त्यातील लोखंडी गज चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.त्यामुळे लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमानंतर लाडक्या चिमुकल्यांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित यंत्रणेने काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!