spot_img
spot_img

महायुतीचे मंत्री येत असताना जिल्हा युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी केले स्थानबद्द !

मलकापूर (हॅलो बुलढाणा/करण झनके) आज मलकापूर येथे महायुतीचे मंत्री येत असताना जिल्हा युवा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध करून नजर कैदेत ठेवले आहे.आंदोलन,उपोषण टाळण्यासाठी व शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली.

प्रतापराव जाधव केंद्रीय आयुष्य, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री, रक्षा खडसे केंद्रीय राज्यमंत्री युवा कल्याण व क्रीडा मंत्रालय हे मलकापूर येथे येत असताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसच्या आनंद पुरोहित सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस , सिद्धांत इंगळे जिल्हा उपाध्यक्ष बुलढाणा युवक काँग्रेस, यांना मलकापूर पोलीसांनी डिटेन करून त्यांना स्थानबद्द करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!