बुलढाणा (हॅलो बुलढाणा) धाड येथील मोहिते यांच्याविरुद्ध अक्षय जीवनलाल बिलंगे या युवकाने पोलीस तक्रार दाखल केली आहे. मोहिते यांनी अश्लील शिवीगाळ करीत बंदूक काढून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अक्षय जीवनलाल बिलंगे याने 20 सप्टेंबर रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दिली की,20 सप्टेंबरच्या रात्री 12:30 वाजताच्या सुमारास मी गोपाल शिंदे व गोलू गुजर या मित्रासोबत टू व्हीलर ने मित्रांना घरी सोडण्यासाठी सरोदे गल्लीतून जात होतो.बाळू खेडकर यांच्या घराजवळ टर्न असल्याने मी टू व्हीलर चा दोनदा हॉर्न वाजविला.दरम्यान सार्वडी गल्लीत राहणारे मोहिते घराबाहेर येऊन यांनी शिवीगाळ सुरू केली आणि जवळची बंदूक काढून आमच्यावर ताणली असून जीवे मारण्याची धमकी दिली अशी तक्रार पोलिसांना देण्यात आली आहे.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.