spot_img
spot_img

चर्चा राहुल बोन्द्रे यांच्या “नृत्याची”……श्वेताताई यांना अजून हवा बदलाचा अंदाज आला नाही?

चिखली (हॅलो बुलडाणा) निमित्त होते गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचे, अमडापूर येथील दोन मानाचे गणपती मंडळ, दोन्हीही गणपती मंडळांनी शांततापूर्वक दहा दिवसाचा गणपती उत्सव साजरा केला, आणि दोन्हीही मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी विद्यमान आमदार सौ. श्वेताताई व माजी आमदार राहुलभाऊ यांना आमंत्रित केले.आता गणपती विसर्जन म्हटले की मिरवणूक आलीच आणि मिरवणूक म्हटले की त्यात नृत्य आलेच,पण पब्लिक फिगर असलेल्या चिखली विधानसभेच्या दोन्ही नेत्यांच्या या मिरवणुकीतून काही राजकीय संकेत ठळकपणे दिसून आले.

सर्वप्रथम कोणत्या नेत्याच्या स्टेजवर कोणती मंडळी होते यावरून त्या गावातील राजकीय अंदाज येतो.अमडापूर गावातील बडे प्रस्थ असलेले “वल्लभराव देशमुख” हे राहुल भाऊ यांच्यासोबत त्यांच्या स्टेजवर होते, आणि त्यांच्या राजकीय, सामाजिक वजनामुळे श्वेताताई यांच्यासोबत असलेली “देशमुख मंडळी” ही स्टेजवर चढण्यास धजावली नाही.यामधून गावामध्ये श्वेताताई यांच्या विरोधात संदेश गेला.

राहुल भाऊ बोंद्रे आमंत्रित असलेल्या स्टेजवर गर्दी मावता मावत नव्हती, तर श्वेता ताई यांच्या स्टेजवर व कार्यक्रमात कार्यकर्त्यांची वानवा जाणवली.उदयनगर येथील “मनोज लाहुडकर प्रकरण” व त्यानंतर “अमडापूरच्या सरपंचविरोधात उच्च न्यायालयात हरलेली केस” या दोन्ही बाबी श्वेताताई महाले यांना बॅक फुटवर नेण्यास कारणीभूत ठरल्या तर नाही?

राहुल भाऊ बोंद्रे यांच्या विषयी एक प्रेमळ सहानुभूती या जिल्हा परिषद सर्कलमध्ये निर्माण झाल्याचे दिसून येते. राहुलभाऊ यांना अक्षरक्ष: डोक्यावर घेऊन तेथील कार्यकर्ते बेभान नाचत होते,अन तेही श्वेताताई यांच्या अगदी समोरासमोर,काही उत्साही कार्यकर्त्यांनी तर याला “भावी विजयाची मिरवणूक” म्हटले.

दोन्हीही लोकप्रतिनिधींनी संयमाची भूमिका घेऊन कोणताही वाद होऊ दिला नाही,हे अतिउत्तम.पण उंद्री, अमडापूर ही प्रचंड मतदार संख्या असलेली गावे श्वेताताई यांच्या हातातून निसटत असल्याची भावना तिथे उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय कार्यकर्ते यांची होती.”जो बून्द् से गई ,वो हौद से नही आती” हे जरी खरे असले तरी महाले साहेब आणि महाले ताई यांनी या दोन्ही गावात प्रचंड लक्ष घालण्याची गरज असल्याचे दिसून येते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!