बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘न भूतो न भविष्यती’असा बुलढाणा शहरातील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या ५१ फूट भव्य दिव्य शिवस्मारकासह सर्व महापुरुषांच्या स्मारकांचा लोकार्पण सोहळा १९ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शुभहस्ते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,केंद्रीय आयुष मंत्री खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला.हा अनुपम सोहळा ठरला आहे.’असा सोहळा पाहिला नाही !’ अशा प्रतिक्रिया शिवरायांच्या स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अनेकांकडून व्यक्त होत्या.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहरांमध्ये ऐतिहासिक विकासकामे पुर्ण झाली, लोकार्पण सोहळ्या दरम्यान लाखोच्यावर शिवभक्तांनी आपली उपस्थिती लावून नेत्रदीपक आणि भव्यदिव्य ऐतिहासिक सोहळा याची देही याची डोळा अनुभवला.
बुलढाणा शहरातील विविध चौकांमध्ये आणि प्रमुख रस्त्यांच्या कोपऱ्यावर बसवण्यात आलेल्या महापुरुषांच्या विविध १८ पुतळ्यांचे अनावरण उत्साहात करण्यात आले.
यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, जिजाऊ आणि बाल शिवबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाबाई आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, छत्रपती संभाजी महाराज, सेवालाल महाराज, जय जवान स्मारक अशा विविध पुतळ्यांचा आणि स्मारकाचा समावेश होता. याप्रसंगी जागोजागी पुष्पहार आणि फुलांचा वर्षाव करत मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा उद्घाटन सोहळा पार पडला.