बुलढाणा (हॅलो बुलढाणा) काँग्रेस प्रदेश सचिव ॲड. जयश्रीताई शेळके आज निवेदन देण्यासाठी जयस्तंभ चौकात पोलिसांना वेळ मागित असताना पोलिसांनी त्यांच्याशी झटपट केली.परंतु वाघिणीचा अवतार जयश्री ताईंनी धारण केला होता त्यांनी पोलिसांना देखील जुमानले नाही तर हुकूमशाही विरोधात आवाज उठविला.
तत्पूर्वी जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी शेतकऱ्यांनी लिहिलेले रक्ताने निवेदन देण्यासाठी पोलिसांना वेळ मागितली असता पोलिस व आमदार राहुल बोंद्रे यांच्यामध्ये झटापट झाली होती.दरम्यान कांग्रेस कार्यकर्त्यांनी हे हुकुमशाही की गुंडशाही असे म्हणत या प्रकाराचा काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त केला.दरम्यान
आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री बुलढाण्यात येत आहेत.लाडकी बहिण या संदर्भात कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला आहे.परंतु समस्यांचे निवेदन देणाऱ्या लाडक्या बहिणीला पोलिसांनी अशी गैरवर्तणूक देणे कितपत योग्य आहे असा सवाल अनेकांनी यावेळी उपस्थित केला आहे.