बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जवळपास 18 पुतळ्यांच्यावर 19 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.त्यामुळे 19 सप्टेंबरला म्हणजे उद्या शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे नाहक शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या प्रतिक्रिया काँग्रेस
कडून उमटत आहेत.काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की ,आमदार संजय गायकवाड यांचे असे आहे की ‘मला पहा आणि पानफुल वाहा!’या आत्मपूजेने ते प्रेरित असून आता शाळेतील मुलाला देखील त्यांनी सोडले नाही.केवळ कार्यक्रमाला गर्दी करण्यासाठी आणि शाळेतील मुले या कार्यक्रमात बसविण्यासाठी हा प्रकार सुरू असल्याचे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. हा प्रश्नमहाराष्ट्र प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनीसुद्धा उचलला आहे आहे. शाळेला सुट्टी देणं हे कोणत्या तत्त्वात बसते ?असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.संजय राठोड म्हणाले की शाळेला सुट्टी देण्यात आल्याची गोष्ट दुर्दैवी असून परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.कार्यक्रमाला गर्दी व्हावी हा दृष्टिकोन समोर ठेवण्यात आला असावा असे राठोड म्हणाले.