बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात कोणी आडवा आला तर कुत्र्यांना काढून टाकीन ‘ असे विधान आमदार संजय गायकवाड यांनी तत्पूर्वी केले होते.दरम्यान आज माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पलटवार करीत’ जो गरजते है, वो बरसते नही’ असा दाखला देत आमदार गायकवाड यांच्यावर पलटवार केला.
माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ आज 17 सप्टेंबरला म्हणाले की, एकीकडे महापुरुषांचे अनावरण आणि दुसरीकडे लाडक्या बहिणींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.अशात आमदार संजय गायकवाड यांनी बेताल भाषा करणे अयोग्य आहे.त्यांनी केलेली गर्जना मूळ भ्रष्टाचारावरून व पुतळ्यांच्या झालेल्या तथाकथित उनिवा झाकण्याकरिता केविलवाणा प्रयत्न असल्याचे सपकाळ म्हणाले.