देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) शेतातील नाली फोडून शेतकऱ्याला नवरा व बायकोने मारहाण करीत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार मेव्हणाराजा शिवारात घडला.
पोलीस सूत्रानुसार, देऊळगाव राजा तालुक्यातील मेव्हणाराजा येथे मुकुंद उत्तमराव कुलकर्णी या 62 वर्षीय गृहस्थाची शेती आहे.ते आपल्या शेतात फेरी मारायला गेले असताना,त्यांना आरोपी कैलास नारायण चाटे व व त्याची पत्नी शेतातील नाली फोडताना दिसले. नाली फोडल्यामुळे कुलकर्णी यांच्या शेतात पावसाचे पाणी शिरत होते.त्यामुळे त्यांनी आरोपींना नालीका फोडली अशी विचारणा केली असता, आरोपींनी वाद घातला.शिवीगाळ करून काठीने डाव्या डोळ्याच्या खाली पाठीवर व डोक्यावर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी दोन्ही आरोपींवर कलम 118(1),352,351(2),(3),3(5),बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात सतीश नागरे करीत आहेत.












Total Users : 3417996