spot_img
spot_img

लोहपुरुषाला मानवंदना! बुलढाण्यात पोलिसांच्या पुढाकाराने ‘रन फॉर युनिटी’ने धावले एकतेचे पाऊल!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घुमला.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात आज दि. 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता पोलीस कवायत मैदानावर ‘रन फॉर युनिटी’ राष्ट्रीय दौडीचे आयोजन करण्यात आले होते. एसपी तांबे यांनी स्वतः हिरवी झेंडी दाखवून दौडीला हिरवा कंदील दिला. ही मॅरेथॉन शहरातील प्रमुख मार्गांवरून धावली – करंजा चौक, एडद चौक, नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय इमारत, त्रिशरण चौक मार्गे पुन्हा पोलीस कवायत मैदानावर तिचा समारोप झाला.

फक्त पोलीस दलच नाही, तर संपूर्ण बुलढाणा या दौडीत सहभागी झाले. पोलीस अधिकारी-अंमलदारांसह शहरातील डब्ल्यूडब्ल्यूसी, फाउंडेशन, ध्येय, मिसळ मित्र ग्रुप, रणरागिणी ग्रुप, सायकलिंग ग्रुप, ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर ग्रुप, एडद स्कूल, एस.बी.आय. बँक रनिंग ग्रुप, रामरक्षा इंग्लीश स्कूल पाडळीचे विद्यार्थी, शिक्षक, नागरिक मोठ्या संख्येने धावले.
या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. गीतांजली तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, पोउपअधी (मुख्या) रवी राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना एसपी निलेश तांबे यांनी केली, तर सर्वांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोहेकॉ निलेश रत्नपारखी यांनी केले तर आभार प्रदर्शन पोनि हेमंत ठाकरे यांनी केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!