देऊळगांव राजा (हॅलो बुलडाणा /संतोष जाधव) बदलापूर येथील नामवंत शाळेत शिक्षण घेत असलेल्या चार व सहा वर्षीय या दोन विद्यार्थिनीवर झालेल्या लैगिक अत्याचारामुळे राज्याला हादरा बसला आहे. त्याचबरोबर सिंदखेड राजा तालुक्यातील एका शाळेत देखील जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने विद्यार्थ्यांनी सोबत केलेल्या विनयभंगाच्या प्रकारामुळे पालकांमध्ये भितियुक्त वातावरण पसरले आहे.दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी मनिषा कदम यांनी तालुक्यातील सिंनगांव जहाँ येथील आदर्श महाविद्यालय, जनता विद्यालय, जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थी व विध्यार्थ्यांनीना “गुड टच” व “बॅड टच” कसा असतोय याचा पाठ गिरवीला.
‘ गुड म्हणजेच चांगला बॅड म्हणजेच वाईट’ त्यांना कळेल अशा सहज सोप्या भाषेत चिमुकल्यांशी संवाद साधला. बॅड टच केल्यास सर्व प्रथम काय करावे, सुरुवातीला कोणाला माहिती द्यावी, आपण कोणती सावधानता बाळगली पाहिजे अशी माहिती डीवायएस कदम यांनी दिली.यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षकबांधव व शिक्षिका उपस्थित होत्या.














