घाटबोरी (हॅलो बुलढाणा) मेहकर तालुक्यातील घाटबोरी गावच्या गटग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभारामुळे चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर रस्त्यावर घाणपाण्याच्यां गटारी साचलेल्या आहेत. त्यामुळे रहदारीच्या रस्त्यावर काय त्या गटारी? काय ते ? तो रस्ता? ओके मधेच! असं म्हणण्याची वेळ आता गावकऱ्यांवर ओढवली आहे. त्यामुळे नुसत्या थापा आणि विकासाच्या नावाने बोंबाबोंब झाली आहे. त्यामुळे आम्ही फक्त कराचाच भरणा करायचा का? असा प्रश्न या गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
गावातील विविध समस्यांनी येथील नागरिकांना भेडसावत आहेत. गावात ठिकठिकाणी रस्त्यावर घाणपाण्याच्यां गटारी साचलेल्या आहेत. मात्र, गट ग्रामपंचायतीच्या ढिसाळ कारभाराला आता येथील नागरिक कंटाळून कोणी उपोषण करते तर कोणी वेगवेगळे अनोखी आंदोलन करीत आहेत. तरीही झोपेचं सोंग घेतलेल्या कर्तव्यदक्ष सरपंच महोदयांना जाग येत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
▪️गावात राहतोय ही आमची चूक आहे का?
आमच्या कडून घरटॅक्स, नळपट्टी, दिवाकर, मालमत्ता कर वसूल केला जातो. मात्र, मुलभूत सोयी सुविधा पुरविल्या जात नाही. रस्ते,नाल्या आदी कशाचा पत्ता नाही. त्यामुळे आम्ही कर भरतो आणि गावात राहतोय ही आमची चूक आहे का? असा सवाल नागरिकांचा आहे.














