बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘लालच बुरी बला है!’ हे सुशिक्षितांना देखील कळत नाही.शेअर मार्केट ट्रेडींंग करण्याची जणू शर्यतच लागली आहे. जो-तो शेअर मार्केट ट्रेडींंग करून बक्कळ पैसे कमविण्याची लालसा करतो. देऊळगाव राजा येथील एका आयटी इंजिनियरची 80,90,00 रुपयांनी ऑनलाइन फसवणूक झाली आहे.
प्रसाद गजानन महाजन रा. देऊळगाव राजा हे पुणे येथील विणजीट कंपनीत आयटी इंजिनियर म्हणून वर्क फ्रॉम होम असा व्यवसाय करतात.त्यांचे पुणे येथील डी बी एस बँकेत सेविंग अकाउंट आहे. प्रसाद हे जुलै 2024 मध्ये फॉर्च्यून सेंटर या नावाने व्हाट्सअप अकाउंटमध्ये ऍड होते.या ग्रुपमध्ये त्यांना ऑनलाईन ट्रेडिंग, शेअर मार्केट बिझनेस बाबत पोस्ट येत होती.दरम्यान ग्रुप ॲडमिनने व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे ऑनलाइन ट्रेडिंगची उपयोगिता समजून सांगितली.जी एस मॅनेजमेंट ग्रुप ची लिंक पाठवून शेअर मार्केट ॲप मध्ये सामावून घेतले.दरम्यान 12 जुलै 2024 रोजी सदर ट्रेडिंग ॲपवर डी बी एस बँक खात्यामधून ट्रेडिंग ॲप ग्रुपने दिलेल्या खाते क्रमांकावर 10,000 रुपये प्रसाद यांनी फोन पे द्वारे पाठविले.त्यानंतर प्रसाद यांना ट्रेडिंग ग्रुप कडून 11700 रुपये प्राप्त झाले. दरम्यान प्रसाद वेगवेगळी रक्कम पाठवीत गेले.त्यांनी तब्बल 80,90,00 रुपयांची रक्कम वेगवेगळ्या खात्यावर पाठविली.परंतु प्रसाद महाजन यांना या रकमेबद्दलचा कुठलाही परतावा किंवा मुद्दल रक्कम मिळाली नाही.अज्ञात भामट्याने ही रक्कम शेअर मार्केटच्या नावाखाली ऑनलाइन खात्यात ट्रान्सफर करून महाजन यांची फसवणूक केली आहे.या संदर्भात बुलढाणा साहेब पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.














