बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बुलढाणा जिल्हा बालरोग संघटनाच्या वतीने संपूर्ण जिल्हाभरात ब्रेस्टफीडिंग अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे स्तनपान सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे. या अंतर्गत मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आणि परिचारिका यांनी तयार केलेल्या पोस्टरची प्रदर्शनी आणि निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 7 ऑगस्ट
रोजी सकाळी 9 वाजता एएसपीएम मेडिकल कॉलेज अजिंठारोड, बुलढाणा
या ठिकाणी पोस्टरचे प्रदर्शन आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम घेण्यात येणार असून कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.














