बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जुलै या एकाच महिन्यात डेंग्यूचे 22 रुग्ण आढळले तर जानेवारीपासून आतापर्यंत डेंग्यूची संख्या 38 वर पोहोचली आहे.व्हायरल तापाने जिल्हा फणफणत असून,या महिन्यात 1106 रुग्ण आढळले आहेत.परिणामी जिल्हा आरोग्य विभाग अशक्त दिसत असून,या विभागाला सलाईन देणे गरजेचे वाटत आहे.
सध्या व्हायरल तापाच्या साथीने जिल्हा फणफणत आहे.नेमक्या याच संधीचे सोने करीत खाजगी डॉक्टर कुठलेही बिल न देता रुग्णांना थेट 25 रुपयांची सलाईन लावून 500 रुपये उकळत आहेत.या गंभीर बाबीचा विचार करणे आरोग्य विभागाचे कर्तव्य आहे.परंतु जिल्हा आरोग्य अधिकारी याकडे दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे.वातावरण बदलल्याने रोगराई पसरली आहे.डेंग्यू व व्हायरल तापीने डोके वर काढले आहे.परिणामी जिल्हा सामान्य रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात रुग्णांची गर्दी वाढली आहे.तात्काळ इलाज व्हावा म्हणून अनेक रुग्ण खाजगी दवाखान्यांचा दरवाजा ठोठावतात.परंतु खाते डॉक्टर संधी साधून रुग्णांची पिळवणूक करीत असल्याचे वास्तव दिसून येत आहे.रुग्णाला कमजोरी आल्याचे सांगून डी 5, डी 10,एनएस, डीएनएस ,आरएल अशा सलाईन दिल्या जात आहे.वीस ते पंचवीस रुपयांची ही सलाईन देऊन रुग्णांकडून पाचशे रुपये घेण्यात येत आहेत.हा प्रकार आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या गोरगरिबांना पिळणूक करणारा ठरत आहे.याकडे मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांची दुर्लक्ष दिसून येत आहे.खाजगी तर कुणाला यातील डॉक्टरांची ही लूट अनेक दिवसांपासून सुरू असली तरी शासकीय रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक खाजगी डॉक्टरांवर कोणतीही कारवाई करत नाही.जिल्ह्यात अनेक डॉक्टर चांगली रुग्ण सेवा देत आहेत.परंतु काहींनी रुग्णांच्या आरोग्याची खेळ चालविला आहे.याकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष वेधने गरजेचे झाले आहे.














