बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील तब्बल 13,613 शेतकरी अतिवृष्टीने बाधित झाले. त्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत. तब्बल 10716.34 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. दरम्यान कृषी विभागाने 1185.90 लाख रुपयांचा मोबदला शासनाला मागितला आहे. विशेष म्हणजे शासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत असून बळीराजांचा बळी घेते का असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.
माहे जून 2024 मध्ये चिखली तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतीपिके /फळपिकांचे नुकसान झाले आहे, बाधित शेतकरी संख्या 32, बाधित क्षेत्र हेक्टर 6.70 अपेक्षित निधी मागणी 1 लाख 14 हजार तसेच जमीन वाहून /खरडून नुकसान झालेल्या बाधित शेतकरी संख्या 2060, बाधित क्षेत्र 163.00 हेक्टर, अपेक्षित निधी मागणी 45 लाख 32 हजार एवढी आहे.
माहे जुलै 2024 मध्ये खामगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिके /फळ पिकांचे नुकसान झाले आहे बाधित शेतकरी संख्या 7849, बाधित क्षेत्र हेक्टर 7837.26, अपेक्षित निधी मागणी 6 कोटी 70 लाख 37 हजार तसेच जमीन वाहून /खरडून बाधित शेतकरी संख्या 1216, बाधित क्षेत्र हेक्टर 619.98, अपेक्षित निधी मागणी 2 कोटी 91 लाख 39 हजार आहे.










