spot_img
spot_img

‘दुसरो को बाटते.. हमको क्यू दाटते?’ -आमच्या संसारासाठी देखील भांडे लागतात हो साहेब!

चांडोळ (हॅलो बुलढाणा) धाड व चांडोळ सर्कल मध्ये जिल्हा कामगार अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत सुरू असलेली शासनाची

संसार भांडे योजना आम्हाला कधी मिळणार? असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसने मोर्चा काढला तर त्यांना तात्काळ भांडे वाटप करण्यात आले. साहेब आम्हालाही संसारासाठी भांडे लागतात,असे कार्यालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या मजुरांनी अधिकाऱ्यांना आर्जव घातली आहे.

राज्य सरकार कळून बांधकामगार मजुरांना मिळणारे संसार भांडे योजनेचा लाभ घेण्या पासून धाड ,चांडोळ सर्कल येथील मजूर वंचित आहे. सर्व महाराष्ट्रात संसार भांडे योजना वाटप सुरु आहे तर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा वाटप सुरु आहे. पण बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील जास्त गाव वंचित आहे. काँग्रेसने याबाबत मोर्चा काढला तर तेथे वाटप सुरू झाले.
काही दिवसांनी आचार संहिता लागू हुईल आणि संसार भांडे योजना वाटप खंडित पडेल. आता शासन व बांधकामगार अधिकारी या कडे लक्ष देतील का असं प्रश्न बांधकामगार मजुरांना पडला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!