मेहकर (हॅलो बुलढाणा) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी मेहकर दौऱ्यावर आले असतानाच डोणगाव पोलिसांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांना ताब्यात घेतले. टाले यांना सकाळपासून पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले आहे. या कारवाईवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शिंदे आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
एकीकडे दुष्काळ संवादाचा दिखावा, तर दुसरीकडे पोलिसी बळावर शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप तुपकरांनी केला. दुष्काळ एल्गार मोर्चामुळे प्रतापराव जाधव यांच्या पायाखालची वाळू सरकली असून संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून धमकावले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
‘जितकी दडपशाही कराल, तितका संघर्ष अधिक तीव्र होईल! आवाज दबणार नाही, लढा थांबणार नाही!’असा इशारा तुपकरांनी सत्ताधाऱ्यांना दिला.






Total Users : 3834321