spot_img
spot_img

ब्रेकिंग! त्या चिठ्ठीत कुणाची नावे! – शहरातील केबल ऑपरेटरने केली आत्महत्या!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एका केबल ऑपरेटरने आत्महत्येचा प्रयत्न करून तत्पूर्वी एका चिठ्ठी तिघांची नावे लिहून ठेवली आहेत. ही चिठ्ठी ‘हॅलो बुलढाणा’च्या हाती लागली असून यातील नावे प्रकाशित करणे सध्यातरी जमणार नाही.निलेश दत्तात्रय डुकरे, समता नगर, बुलढाणा असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. परंतु दुर्दैवाने तो उपचारादरम्यान मरण पावल्याची माहिती समोर येत आहे.

हा प्रकार फसवणुकीच्या प्रकरणातून घडल्याचे सांगण्यात येत आहे. सदर केबल ऑपरेटरने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला होता परंतु दुर्दैवाने त्याची प्राणज्योत उपचारा दरम्यान मालवली. सदर केबल ऑपरेटरनेआधी एक चिठ्ठी लिहून ठेवली, “त्या” चिठ्ठीत तिघांची नावे लिहिली आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करणारा तरुण हा बुलडाणा शहरातीलच राहणारा असून निलेश दत्तात्रय डुकरे,समता नगर असे त्याचे नाव आहे. आपल्या नावावर दोघांनी पैसा उचलला, त्यांनी मला बाहेरून त्रास दिला. मला त्यात गुंतवून कर्जबाजारी केले असे केबल ऑपरेटरने चिठ्ठीत लिहिले असून त्यात तिघांची नावे आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!