spot_img
spot_img

जळगाव जामोद सज्ज रक्तदानाच्या महाकुंभासाठी! हजार रक्तदात्यांचा संकल्प; ६४० जणांची नोंदणी! ‘रक्ताचा प्रत्येक थेंब, कुणाच्या तरी जगण्याची आशा!’ पंजाब म्हसाळ व अनमोल सहकार्य मित्र परिवाराचा मानवतेसाठी दमदार पुढाकार!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) कुणाच्या घरातील दिवा विझू नये, रक्ताअभावी कुणाचा जीव जाऊ नये, यासाठी जळगाव जामोदमध्ये मानवतेचा अनोखा महाकुंभ रंगणार आहे. जागतिक एड्स दिनानिमित्त पंजाब म्हसाळ व अनमोल सहकार्य मित्र परिवाराच्या वतीने मंगळवार, १ डिसेंबर २०२६ रोजी सामान्य रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तब्बल एक हजार रक्तदात्यांचा सहभाग नोंदविण्याचा निर्धार आयोजकांनी केला असून, शिबिरापूर्वीच ६४० रक्तदात्यांनी नोंदणी केली आहे. बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

रक्ताला जात नसते, धर्म नसतो; असते ती फक्त माणुसकीची ओळख! एचआयव्ही आणि एड्सविषयी जनजागृती करण्यासोबतच गरजू रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध करून देण्यासाठी मित्र परिवार सरसावला आहे. तरुणाईने या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मानवतेचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन आयोजकांनी केले.

यावेळी पंजाब म्हसाळ, अजय वानखडे, सावरिया राजपूत, मोईन राज, चतुर्भुज केला, श्रीकृष्ण घोपे, वसंत अरदळे, राहुल राखोडे, साहिल आमोदे यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते.आता जळगाव जामोदकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून हजार रक्तदात्यांचा संकल्प पूर्ण करण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रक्तदानासाठी संपर्क : ८४८३९००५३८ / ९५७९९६४५७२

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!