spot_img
spot_img

बस स्टँडवर गांजा विकायला आले, पोलिसांनीच ‘टिकिट’ काढलं! खामगावात LCB ची धडाकेबाज कारवाई; ५ किलो ९४७ ग्रॅम गांजासह दोघे जेरबंद, ३.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त!

खामगाव (हॅलो बुलढाणा) चिखलीहून खामगावला गांजा विकायला आले होते. बस स्टँडवर ग्राहकाची वाट पाहत होते. पण ग्राहकाआधी पोलीसच पोहोचले आणि पोलिसांनी त्यांचं थेट ‘जेलचं टिकिट’ काढलं! स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बस स्टँडवरच सापळा रचून दोन गांजा तस्करांना रंगेहाथ पकडलं आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अपोअ बुलढाणा श्री. अमोल गायकवाड व अपोअ खामगाव श्री. पीयुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक श्री. हेमंत ठाकरे यांच्या आदेशाने दि. २३ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. खामगाव बस स्टँड येथे गांजा विक्रीसाठी दोघे येणार असल्याची गुप्त माहिती LCB ला मिळाली होती. पथकाने तिथेच दबा धरून बसलं आणि दोघांना गांजासह पकडलं. सचिन प्रभाकर थिगले,शेख सलीम शेख रजाक
दोन्ही रा. चिखली असे आरोपीचे नाव आहे

यांच्या विरुद्ध पो.स्टे. खामगाव शहर येथे अप क्र. /२०२६ कलम ८ (क), २० (ब) NDPS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कडून गांजा ५ किलो ९४७ ग्रॅम (किंमत २,९७,३५० रु),
इतर साहित्य (२०,००० रु.) असा एकूण ३,१७,३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही धडाकेबाज कारवाई API सुनील इंगळे, HC दीपक लेकुरवाळे, HC राजू टेकाळे, HC अनुपकुमार मेहेर, HC विजय वारुळे, Pc मंगेश सनगाळे, Pc सतीश नाटेकर, Lpc आशा मोरे, चालक HC समाधान टेकाळे, Pc निवृत्ती पुंड, स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा, Pc कैलास ठोंबरे, TAW बुलढाणा यांनी ही कारवाई केली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!