बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एका चिमुकल्याने आज जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून स्वतःचं भविष्य पाहिले.
दत्तकविधानाच्या ८ प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेताना जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी एका बालकाला सहज विचारलं, “मोठं होऊन काय होणार?”
क्षणाचाही विचार न करता तो निरागसपणे म्हणाला, “मला कलेक्टर व्हायचंय!”
क्षणभर सगळे थांबले. मग जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला उचलून थेट आपल्या खुर्चीवर बसवलं. “स्वप्न मोठं ठेव, जिद्दीने अभ्यास कर, तू नक्की कलेक्टर होशील,” असं म्हणत त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. त्या एका क्षणात त्या बालकाला फक्त खुर्ची मिळाली नाही, तर आयुष्यभरासाठी आत्मविश्वास मिळाला.याच संवेदनशील पुढाकारामुळे ८ बालकांना आता प्रेमळ, हक्काचं आणि सुरक्षित कुटुंब मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दत्तकविधान ही फक्त कागदपत्रांची प्रक्रिया नाही, तर एका बालकाला मायेचं घर देण्याचा प्रवास आहे, हे जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.













Total Users : 3785422