चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) सभा ५ मिनिटांत गुंडाळली, भ्रष्टाचार लपवला, असा आरोप करणाऱ्या काँग्रेसला नगराध्यक्ष पंडित देशमुख यांनी थेट उत्तर दिलंय. “आम्ही नाही, गोंधळ काँग्रेसनेच घातला!” असा पलटवार त्यांनी केला आहे.
नगराध्यक्ष देशमुख म्हणाले अकरा वाजता सभा सुरू झाली. प्रोटोकॉल असा असतो, एक एक विषय वाचायचा, त्यावर चर्चा करायची, मग निर्णय घ्यायचा. पण काँग्रेसच्या सदस्यांनी सुरुवातीलाच कुठलाही विचार न करता एकदम प्रश्न विचारायला सुरुवात केली. सगळे एकदम बोलायला लागले आणि सभागृहात गोंधळ उडाला. हा गोंधळ आम्ही नाही, काँग्रेसने घातला.म्हणून
आम्ही जशास तसं उत्तर दिलं.
आमचं भाजप – शिवसेना युतीचं सरकार आहे. आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन काम करतो. पण काँग्रेसने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. मग आमच्या भाजपच्या सदस्यांनीही जशास तसं उत्तर दिलं. त्याला विरोध केला आणि तरीही सर्व २१ विषय एकमताने मंजूर केले,असे नगराध्यक्ष म्हणाले. आता दोन्ही बाजू आपापल्या जागी ठाम आहेत. पण सभेचं रेकॉर्डिंग आणि इतिवृत्त समोर आल्यावर दूध का दूध, पाणी का पाणी होणार, हे मात्र निश्चित आहे!
▪️५ मिनिटे नाही, १० ते १२ मिनिटे सभा चालली!
काँग्रेसचा ५ मिनिटांचा आरोप खोडून काढताना देशमुख म्हणाले की, अजेंड्यावर २१ विषय होते. सर्व विषयांचं वाचन करण्यात आलं. भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांनी हात वर करून मान्यता दिली. सभा जवळपास १० ते १२ मिनिटे चालली. ५ मिनिटांत सभा गुंडाळली, हा निव्वळ खोटा आरोप आहे!”
▪️आता प्रश्न काँग्रेसला..!
प्रोटोकॉल मोडून एकदम सगळे बोलायला लागले, हा कोणता नियम? एक एक विषयावर चर्चा करायची सोडून गोंधळ घालायचा, हाच का काँग्रेसचा लोकशाहीचा मार्ग? २१ विषय वाचून मंजूर झाले असताना, “चर्चाच झाली नाही” म्हणणं, हे खोटं नाही का?भ्रष्टाचाराचा आरोप करायचा, पण पुरावा द्यायचा नाही, हाच का डाव?













Total Users : 3783473