रायपूर (हॅलो बुलढाणा/सचिन जैस्वाल) रायपूरच्या श्री शिवाजी विद्यालयातील शिक्षक गजानन नारायण जाधव सर यांच्या मेहनतीवर पदोन्नतीची मोहोर उमटली आहे. वर्गात विद्यार्थ्यांना घडवणारे जाधव सर आता मुख्याध्यापक म्हणून संपूर्ण विद्यालयाचे नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या पदोन्नतीची बातमी समजताच गावातील मान्यवर, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
पदोन्नतीनिमित्त आयोजित स्वागत समारंभात संस्थेचे सचिव कोरडे पाटील सर यांनी जाधव सरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. शिक्षकाच्या मेहनतीची दखल घेत कोरडे पाटील यांनी स्वतःच्या हस्ते केलेला हा गौरव शालेय परिवारासाठीही कौतुकाचा क्षण ठरला. जाधव सरांच्या शैक्षणिक वाटचालीत या पदोन्नतीने नवे पर्व सुरू झाले असून, मुख्याध्यापकपदाच्या नव्या जबाबदारीसाठी त्यांना रायपूरमधून शुभेच्छा मिळत आहेत.





Total Users : 3723221