बुलढाणा (हॅलो बुलढाणा) यंदाच्या दिवाळीत अंगणात गड उभारा आणि आपल्या कल्पकतेची छाप पाडा! बुलढाणा शहरासाठी आयोजित ‘किल्ला बनवणे स्पर्धा २०२६’मध्ये ८ ते ४५ वर्षे वयोगटातील स्पर्धकांना भाग घेता येणार आहे. कल्पकतेने किल्ला साकारणाऱ्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे मिळणार आहेत.
तटबंदी, बुरूज आणि दरवाजे घडवत गडकोटांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची ही संधी आहे. स्पर्धेचे नियम आणि अटी पोस्टरवर दिल्या आहेत. नोंदणीची अंतिम तारीख ९ नोव्हेंबर २०२६ असून, अधिक माहितीसाठी शुभम निकम (९९६०४३३७५४) यांच्याशी संपर्क साधावा. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





Total Users : 3723217