spot_img
spot_img

EXCLUSIVE! सरनाईकांच्या प्रचाराआधीच महायुतीत बंडाचा भडका! भाजपने बैठकीकडे फिरवली पाठ; राष्ट्रवादीचीही नाराजी, उदय सामंतांसमोरच युतीतील बेबनाव उघडा! बोंडे म्हणतात, ‘निमंत्रणच नव्हते’; मग जळगाव जामोदचे आमदार संजय कुटे बैठकीला पोहोचले कसे? सरनाईकांच्या विजयाचे गणित बिघडणार? उद्याच्या बैठकीकडे लक्ष!

अमरावती (हॅलो बुलढाणा/विशेष प्रतिनिधी) अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीच्या गोटात राजकीय भूकंपाची चिन्हे दिसू लागली आहेत! उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी आयोजित समन्वय बैठकीतच घटक पक्षांमधील मतभेद उफाळून आले. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीकडे अमरावतीतील प्रमुख भाजप नेत्यांनी पाठ फिरवल्याने सरनाईकांच्या प्रचार मोहिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रचाराचा नारळ फुटण्याआधीच महायुतीत नाराजीचा स्फोट!

उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप आणि राष्ट्रवादीला विश्वासात घेतले नसल्याच्या मुद्द्यावरून सरनाईकांविरोधात नाराजी असल्याचे समोर येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी विमाशी संघाचे उमेदवार दिलीप कडू यांच्या प्रचारात सहभाग घेतल्याने महायुतीतील विसंवाद आणखी ठळक झाला आहे.

बोंडेंच्या विधानाने नवा ट्विस्ट!

खासदार अनिल बोंडे यांनी बैठकीचे निमंत्रणच नसल्याचे सांगत ही शिवसेनेची अंतर्गत बैठक असल्याचे स्पष्ट केले. मात्र जळगाव जामोदचे भाजप आमदार संजय कुटे बैठकीला पोहोचल्याने नेमके निमंत्रण कुणाला होते आणि कुणाला नव्हते, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.दुसरीकडे डॉ. संगीता शिंदे निवडणुकीच्या रिंगणात असून शेखर भोयर यांनाही काही नेत्यांची मदत मिळण्याची चर्चा आहे. बैठकीतील नियोजनावरून सरनाईकांनीही नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

 

सामंतांची शिष्टाई; पण महायुतीतील फूट मिटणार?

उदय सामंत यांनी उद्या१६ ऑक्टोबरला पुन्हा समन्वय बैठक घेण्याची घोषणा केली आहे. विजयाचा विश्वास सामंत व्यक्त करत असले, तरी स्वतःच्या मित्रपक्षांची मोट बांधण्यात सरनाईक यशस्वी होणार की अंतर्गत नाराजीच त्यांच्या विजयाच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरणार? याकडे संपूर्ण शिक्षक मतदारसंघाचे लक्ष लागले आहे!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!