spot_img
spot_img

हे काय? सासऱ्याला मोगरीने ठेचले! सुनेला चापट-बुक्क्यांनी मारहाण; को-हाळा बाजारात चौघांचा हैदोस!

धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा/सादीक शेख) मोताळा तालुक्यातील को-हाळा बाजारात दादागिरीचा कळस गाठला आहे. परस्पर वादातून एकाच कुटुंबातील तिघांवर चौघांनी टोळी बनवून हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेसह पती आणि वृद्ध सासऱ्याला लाकडी मोगरीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटना १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजता घडली. फिर्यादी सौ. संगीता ज्ञानेश्वर बढे (वय ३८, रा. को-हाळा बाजार) यांनी धामणगाव बढे पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार, आरोपी विलास पंढरी सोनोने, योगेश विलास सोनोने, सुनीता विलास सोनोने आणि मनिषा विलास सोनोने (सर्व रा. को-हाळा बाजार) यांनी संगनमत करून हल्ला चढवला.
आरोपींनी आधी शिवीगाळ सुरू केली, त्यानंतर चापट-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी आरोपी सुनीता सोनोने हिने हातातील लाकडी मोगरी थेट वृद्ध श्रीराम बढे यांच्या डोक्यात हाणली.त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.
तर आरोपी मनिषा सोनोने हिने सौ. संगीता बढे यांना अडवून बेदम मारहाण केली आणि ‘जीवेच मारून टाकू’ अशी उघड धमकी दिल्याचा आरोप आहे. पती ज्ञानेश्वर बढे यांनाही या टोळक्याने सोडले नाही.

▪️पोलिसांची कारवाई !

या प्रकरणी धामणगाव बढे पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध BNS कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास बिट जमादार शरद बाठे करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!