चिखली (हॅलो बुलढाणा/सैय्यद साहिल) आई, सख्खा भाऊ अन् तरुण पुतण्याच्या हत्येने जिल्ह्याला हादरवणाऱ्या सोमठाणा तिहेरी हत्याकांडात महत्त्वाची घडामोड! पनवेलमध्ये आत्मसमर्पण केलेल्या मुख्य आरोपी दीपक फत्तेसिंग सुरडकरला घेऊन चिखली पोलिसांचे डीबी पथक चिखलीकडे रवाना झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आज, १० ऑक्टोबरला रात्री नऊच्या सुमारास पथक चिखलीत दाखल होण्याची शक्यता आहे.
पीएसआय भागवतकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल गवई आणि पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर शिंदे हे आरोपीला घेऊन येत आहेत. आरोपीला अटक केल्याचा फोटो सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’कडे प्राप्त झाला आहे. जिल्ह्यात या हत्याकांडाची बातमी सर्वप्रथम ‘हॅलो बुलढाणा’नेच प्रसारित केली होती, हे विशेष!
तीन एकर शेतीच्या बक्षीसपत्रावरून धुमसणाऱ्या वादातून सरस्वतीबाई, संजय आणि रणजीत सुरडकर यांची हत्या केल्याचा आरोप दीपक व त्याचा मुलगा जगदीशवर आहे. जगदीशला ९ ऑक्टोबरच्या पहाटे ३:३५ वाजता अटक झाली.
दरम्यान, संजय यांच्या पत्नी आणि मुलीचाही आरोपीने शोध घेतल्याची माहिती असून, त्याची अधिकृत पुष्टी अद्याप आवश्यक आहे. एसपी डॉ. निलेश तांबेंच्या तत्पर धावीनंतर पोलिसांनी नाकेबंदी व शोधमोहीम राबवली होती. निरीक्षक भूषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.आरोपी चिखलीत आल्यानंतर चौकशीत आणखी कोणते धागेदोरे उलगडणार?




Total Users : 3591599