spot_img
spot_img

BIG EXCLUSIVE! ‘हॅलो बुलढाणा’ने वेदना मांडल्या… बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड धावले; मग आमदार कुटे साहेब, तुम्ही कुठे? गर्भवतीचा जीव गेला, चाळीस टपरीचा आक्रोश जिल्हाधिकारी दरबारी पोहोचला! ‘निवडणुकीनंतर गावात एकदाही आले नाहीत,’ आंदोलकांचा दावा; आपल्या मतदारांच्या अश्रूंना स्थानिक आमदार उत्तर देणार कधी?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एका गर्भवतीचा मृत्यू, रस्त्यांसाठी आक्रोश आणि मूलभूत सुविधांसाठी अन्नत्याग आंदोलन! चाळीस टपरीतील आदिवासी बांधवांच्या वेदना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचल्या; मात्र आपल्या मतदारसंघाचे आमदार संजय कुटे कुठे आहेत, असा सवाल उपोषणकर्ते उपस्थित करत आहेत. “निवडणुकीनंतर आमदार आमच्या गावात एकदाही आले नाहीत,” असा आंदोलकांचा दावा आहे.

रस्ता नसल्याने गर्भवतीला कापडी झोळीतून नेण्याची वेळ आल्याचे आणि उपचारासाठी नेताना तिचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ‘हॅलो बुलढाणा’ने सर्वप्रथम समोर आणल्याचे ग्रामस्थ आणि वृत्तमाध्यमाचे म्हणणे आहे. ही बातमी लाखो वाचकांपर्यंत पोहोचली. मात्र, एवढ्या गंभीर घटनेनंतरही स्थानिक आमदारांनी आंदोलनस्थळी भेट दिली नसल्याचे आंदोलक सांगतात.

दुसरीकडे, बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा ऐकल्या आणि रुग्णवाहिकेची सुविधा देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आंदोलकांनी दिली. शेतकरी नेते रविकांत तुपकर, काँग्रेस नेत्या डॉ.स्वाती वाकेकर आणि काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील आवचार यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. “बुलढाण्याचे आमदार गायकवाड आमची दखल घेतात; मग आमच्या मतदारसंघाचे संजूभाऊ का घेत नाहीत?” हा त्यांचा थेट प्रश्न आहे.

दरम्यान, ४ ऑक्टोबरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार, भिंगारा-गोमाळ रस्त्याची वनमंजुरी प्रक्रिया विनाविलंब करण्याचे निर्देश देण्यात आले. आरोग्य उपकेंद्रासाठी डॉक्टर-नर्स, चार गावांसाठी १०८ रुग्णवाहिका व्यवस्था, अत्यावश्यक औषधे व लसींचा साठा आणि मृत महिलेच्या कुटुंबाला संबंधित योजनेतून दोन लाख रुपये मदत देण्याची कार्यवाही करण्यास सांगण्यात आले.

गोमाळमधील तीन बालकांच्या मृत्यूच्या चौकशीचेही निर्देश आहेत. शाळा, अंगणवाडी, वीज आणि जात प्रमाणपत्रांच्या प्रश्नांवर कार्यवाही अपेक्षित आहे.
आता कागदावरील निर्देश प्रत्यक्षात कधी उतरणार? आदिवासींना पुन्हा जीव गमावल्यानंतरच सुविधा मिळणार का? संजय कुटे यांच्या अनुपस्थितीबाबतच्या आरोपांवर त्यांची बाजू उपलब्ध झालेली नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!