spot_img
spot_img

हातात झाडू, कृतीत गांधींचा विचार! कृषी विद्यार्थ्यांची स्वच्छतेसाठी मैदानात एंट्री; वडशिंगीत शाळा अन् शिवस्मारकाचा परिसर चकाचक!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून थांबायचे नाही, त्यांच्या विचारांना कृतीत उतरवायचे! हाच संकल्प घेऊन स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकातील विद्यार्थ्यांनी वडशिंगी येथे स्वच्छता उपक्रम राबविला. ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत २ ऑक्टोबरला गांधी व शास्त्री जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेत शाळा परिसर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाची स्वच्छता केली.

परिसरातील कचरा, प्लास्टिक आणि अनावश्यक वस्तू हटवत विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छतेसाठी पुढाकार घ्या, जबाबदारी स्वीकारा!’ असा कृतीतून संदेश दिला. स्वच्छता ही एका दिवसाची मोहीम नसून प्रत्येकाची दैनंदिन जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल खोद्रे होते. मान्यवरांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. मुख्याध्यापक विजय म्हसाळ यांनी दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त केले.

वर्षा राजगुरे यांनी सूत्रसंचालन केले, तर दत्तात्रय खेडेकर यांनी आभार मानले. प्राचार्य प्रा. योगेश गवई आणि प्राचार्य डॉ. रविराज उदासी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!