spot_img
spot_img

ए एम ऑइल कंपनीत छापा; साडेतीन कोटींचे बोगस खाद्यतेल जप्त! तुकाराम मुंढे यांच्या पथकाच्या कारवाईने खळबळ!

खामगाव (हॅलो बुलढाणा) एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाने खामगाव एमआयडीसी मधील ए एम ऑइल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत छापा टाकून तब्बल साडेतीन कोटींचे बोगस खाद्यतेल जप्त केले आहे. विशेष म्हणजे कुठलाही परवाना नसताना खाद्यतेलाचे उत्पादन या कंपनीत सुरू होते.अन्न व औषध प्रशासन आता या कंपनीने कुठे कुठे तेल वितरित केले याचा शोध घेत आहे.

अन्न व औषध प्रशासनाचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पथकाने महाराष्ट्रभरात भेसळयुक्त आणि बेकायदेशीर खाद्यतेलाविरोधात अनेक ठिकाणी धडक कारवाया केल्या आहेत.महाराष्ट्रात आरोग्यास अपायकारक ठरणाऱ्या सुटे किंवा विनापरवाना खाद्यतेल विक्रीवर राज्यव्यापी बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान तुकाराम मुंढे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव एमआयडीसी कडे कारवाईचा मोर्चा वळवला आहे. त्यांच्या पथकाने विना परवाना खाद्यतेलाचे उत्पादन सुरु असलेल्या ए एम ऑइल कंपनीत छापा टाकून साडेतीन कोटींचे बोगस खाद्यतेल जप्त केले आहे.या धडक कारवाईमुळे भेसळ माफीयामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!