spot_img
spot_img

आदिवासी युवकाला मारहाण प्रकरण पेटले! प्रकरणी फिर्याद न घेतल्याने आदिवासी समाज बांधवांचा डोणगाव पोलीस स्टेशनला घेराव! आरोपीला अटक होईपर्यंत पोलीस स्टेशन मधून हलणार नाही; ग्रामस्थांचा ठाम निर्णय!

डोणगाव (हॅलो बुलढाणा) डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल ग्राम नागेश वाडी या ठिकाणी 21 सप्टेंबरच्या संध्याकाळी घाटबोरी येथील काही युवकांनी नागेश वाडी येथील एका युवकाला मारहाण केली होती.या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी डोणगाव पोलीस स्टेशनला गेले असता फिर्याद घेतली नाही. त्यामुळे आज 26 सप्टेंबर रोजी आदिवासी समाज बांधवांनी डोणगाव पोलीस स्टेशनला घेराव करत ठिय्या मांडला! जोपर्यंत आरोपीला अटक होणार नाही, तोपर्यंत पोलिस स्टेशन सोडणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी केला.

डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम नागेश वाडी येथे 21 सप्टेंबर च्या संध्याकाळी अर्जुन कृष्णा डाखोरे वय 25 वर्षे या युवकाला घाटबोरी येथील काही युवकांनी गावात येऊन मारहाण केली होती. या जखमी झालेल्या युवकाला डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद देण्यासाठी आणले असता डोणगाव पोलीस स्टेशन ने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. प्राथमिक आरोग्य केंद्राने बुलढाणा रेफर केले त्यानंतर दुसऱ्या दिवशी डोणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आले असता, फिर्याद घेतली नाही त्यानंतर पुन्हा फिर्याद देण्यासाठी आले असता फिर्याद घेतली नाही. त्यामुळे आज 26 सप्टेंबर रोजी आदिवासी संघटना आदिवासी समाज बांधव यांनी डोणगाव पोलीस स्टेशनला येऊन घेराव घातला. सोबतच जोपर्यंत आरोपीला अटक होणार नाही,तोपर्यंत पोलीस स्टेशन सोडणार नाही, असा निर्धार या लोकांनी घेतला. अन्याय आम्ही सहन कदापि करून घेणार नाही, मागच्या दोन वेळा जेव्हा आम्ही आलो होतो त्यावेळेसचे सीसीटीव्ही फुटेज बघावे व त्या ठिकाणी ड्युटीवर हजर असलेले व आमची फिर्याद न घेणाऱ्या पोलीस अंमलदाराविरुद्ध कारवाई करावी,अशी मागणी सुद्धा यावेळी आदिवासी संघटनाने केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!