spot_img
spot_img

BIG BREAKING | अखेर ‘दुष्काळ’ जाहीर! फडणवीसांचा मोठा फैसला; आता बुलढाण्याच्या शेतकऱ्यांना काय मिळणार? मदत, पीकविमा अन् कर्जाबाबत GR कडे नजरा!

मुंबई (हॅलो बुलढाणा/ वृत्तसंस्था) पावसाच्या प्रदीर्घ खंडाने आणि हातातून गेलेल्या खरीप पिकांनी हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात अखेर दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध भागांतून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत होती. शेतकऱ्यांच्या बांधावर सोयाबीन, कापूस, मका, तूर यांसह अनेक पिकांचे नुकसान झाल्याचे चित्र समोर येत असताना सरकारच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.

आता दुष्काळ जाहीर झाल्यानंतर नेमके कोणते जिल्हे आणि तालुके या निर्णयाच्या कक्षेत येणार, शेतकऱ्यांना किती मदत मिळणार, पीकविमा, कर्ज व इतर सवलतींचे स्वरूप काय असणार? याकडे लक्ष लागले आहे.यामध्ये जळगाव जामोद, संग्रामपूर, चिखली, देऊळगाव राजा, मेहकर, बुलढाणा, सिंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा आणि नांदुरा या सर्व तालुक्यांचा समावेश आहे.

ही BREAKING बातमी असून अधिकृत शासन निर्णय व जिल्हानिहाय तपशील मिळताच ‘हॅलो बुलढाणा’कडून अपडेट दिले जातील.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!