spot_img
spot_img

तहसीलच्या फेऱ्यांना ब्रेक! जिल्ह्यात २ नवीन अपर तहसीलदार कार्यालये मंजूर; साखरखेर्डा-लाखनवाड्याला मोठी प्रशासकीय ताकद!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कामांसाठी वारंवार तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी महसूल प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. बुलढाणा जिल्ह्यात तब्बल २ नवीन अपर तहसीलदार कार्यालयांना मंजुरी देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा आणि खामगाव तालुक्यातील लाखनवाडा येथे आता अपर तहसीलदार कार्यालयांची निर्मिती होणार आहे.

या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांसाठी महसूल विभागाशी संबंधित अनेक कामे अधिक जवळच्या ठिकाणी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दाखले, महसूलविषयक कामे, जमीनविषयक प्रक्रिया आणि अन्य प्रशासकीय सेवांसाठी तालुक्याच्या मुख्यालयापर्यंत करावा लागणारा प्रवास कमी होण्याची शक्यता आहे.वेळ वाचणार, प्रवासाचा खर्च कमी होणार आणि प्रशासनाची दारे नागरिकांच्या आणखी जवळ जाणार, अशी या निर्णयामागची अपेक्षा आहे.

विशेष म्हणजे, नव्या कार्यालयांमुळे ग्रामीण भागातील महसूल प्रशासनाला अधिक गतिमान करण्यासोबतच स्थानिक पातळीवर नागरिकांच्या समस्या जलदगतीने हाताळण्यास मदत होऊ शकते

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!