spot_img
spot_img

शेतात दबा धरून बसलेला ‘काळ’ अचानक समोर! भिंगाऱ्यात अस्वलाचा युवतीवर जीवघेणा हल्ला; गंभीर जखमी गायत्रीवर अकोल्यात उपचार!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) शेतात नेहमीप्रमाणे कामासाठी गेलेल्या युवतीवर अचानक अस्वलाने झडप घातली आणि काही क्षणांतच भिंगारा परिसर हादरून गेला! जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा परिसरात बुधवारी, दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान घडलेल्या या घटनेने शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गायत्री भायलाल डावर ही युवती आपल्या बहिणीसोबत शेतात गेली होती. मात्र, शेत परिसरात अचानक अस्वल समोर आले आणि काही कळण्याच्या आतच त्याने गायत्रीवर हल्ला केला. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. तिला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले असून सध्या अकोला येथे उपचार सुरू आहेत.

ही घटना भिंगारा, पोस्ट सुनगाव, ता. जळगाव जामोद परिसरातील असून, धक्कादायक बाब म्हणजे या भागात अस्वलाच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना नसल्याचे स्थानिक सांगतात. सन २०२४ मध्ये बन्सी डावर यांच्यावरही याच परिसरात अस्वलाने हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे.
अस्वल पुन्हा पुन्हा मानवी वस्तीजवळ येत असेल तर वनविभाग नेमका काय करतोय? आणखी एखादी गंभीर दुर्घटना झाल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का?

शेतात जाणाऱ्या महिला, शेतकरी आणि मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वनविभागाने तातडीने परिसरात गस्त वाढवावी, अस्वलाच्या हालचालींचा शोध घ्यावा आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!