spot_img
spot_img

MAHA BREAKING | ‘हॅलो बुलढाणा’चा सर्वात मोठा राजकीय धमाका! भाजप प्रवेशाच्या काही तास आधी राहुल बोंद्रेंना राहुल गांधींचा फोन? भावना अनावर… ‘सब कुछ गंवा दूंगा…’ म्हणत डोळ्यांत अश्रू; उद्याच्या प्रवेशावरच सस्पेन्स! चिखलीच्या राजकारणात मध्यरात्रीचा ट्विस्ट!

चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) उद्या भाजपमध्ये प्रवेश करण्याची तयारी पूर्ण… मुंबईतील कार्यक्रम ठरलेला… समर्थकांमध्ये उत्साह… आणि नेमक्या त्याच पूर्वसंध्येला असा एक व्हिडिओ समोर आला की चिखलीच्या राजकारणात अक्षरशः खळबळ उडाली आहे!

चिखलीचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा फोन आल्याचा दावा समोर आला आहे. विशेष म्हणजे, या संदर्भातील व्हिडिओ खुद्द राहुल बोंद्रे यांच्या कार्यालयातून ‘हॅलो बुलढाणा’ला प्राप्त झाला आहे.

व्हिडिओतील घटनाक्रमाने राजकीय चर्चांना आणखी वेग दिला आहे. राहुल गांधी यांच्याशी संवाद झाल्यानंतर बोंद्रे अत्यंत भावूक झाल्याचे दिसत असल्याचा दावा त्यांच्या निकटवर्तीयांकडून केला जात आहे. काही क्षणांतच वातावरण बदलल्याचे आणि बोंद्रे यांच्या डोळ्यांत अश्रू आल्याचेही सांगितले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर “सब कुछ गंवा दूंगा…” अशी भावनिक प्रतिक्रिया चर्चेत आली असून, आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.उद्याचा भाजप प्रवेश ठरल्याप्रमाणे होणार की शेवटच्या क्षणी संपूर्ण राजकीय गणितच बदलणार?

कालपर्यंत बोंद्रे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. पण आज समोर आलेल्या या व्हिडिओने राजकीय तापमान अचानक वाढवले आहे.

एक फोन… काही भावनिक क्षण… आणि संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट!

दरम्यान, व्हिडिओ राहुल बोंद्रे यांच्या कार्यालयातून ‘हॅलो बुलढाणा’ला थेट प्राप्त झालेला असला, तरी भाजप प्रवेश रद्द झाल्याची अधिकृत घोषणा अद्याप समोर आलेली नाही.

आता सगळ्यांच्या नजरा एका प्रश्नावर खिळल्या आहे
राहुल बोंद्रे उद्या भाजपच्या मंचावर दिसणार… की ‘राहुल टू राहुल’ फोनने राजकारणाची दिशा बदलणार?

 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!