spot_img
spot_img

EXCLUSIVE आली का तुम्हाला पत्रिका? राहुलभाऊंचा भाजप प्रवेश उद्याच!; श्वेताताईंचीही विशेष उपस्थिती… ‘ताई-भाऊ’ समीकरण जिल्ह्याच्या राजकारणात नवा अध्याय उघडणार?

चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) गेल्या काही दिवसांपासून चिखलीसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची आता अधिकृत घोषणा समोर आली आहे.उद्या मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बोंद्रे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, या प्रवेश सोहळ्याला चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांचीही उपस्थिती राहणार असल्याचे वृत्त आहे.यामुळे चिखलीच्या राजकारणात अनेक वर्षे एकमेकांविरोधात उभे राहिलेले दोन प्रमुख राजकीय चेहरे आता एकाच पक्षाच्या व्यासपीठावर दिसणार का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. श्वेता महाले यांनीही २२ सप्टेंबरची तारीख मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

राहुल बोंद्रे हे चिखलीचे माजी आमदार आणि काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय फेसबुक लाइव्हद्वारे जाहीर केला होता.

आता खरी राजकीय चर्चा मात्र पुढचीच आहे ‘ताई-भाऊ’ एकाच पक्षात आल्यानंतर चिखलीतील भाजपची अंतर्गत राजकीय मांडणी कशी बदलणार? दोघांच्या समर्थकांमध्ये समन्वय होणार की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत नवे समीकरण तयार होणार?

एकेकाळचे राजकीय प्रतिस्पर्धी आता भाजपच्या एका मंचावर येत असल्याने २२ सप्टेंबरचा मुंबईतील पक्षप्रवेश केवळ राहुल बोंद्रे यांचा प्रवेश न राहता चिखलीच्या आगामी राजकारणाची दिशा ठरवणारी घडामोड ठरू शकतो.

म्हणूनच बातमीत शीर्षक घेतला आली का तुम्हाला राहुलभाऊंच्या पक्षप्रवेशाची पत्रिका? आता नजर उद्याच्या मुंबईतील ‘ताई-भाऊ’ फ्रेमकडे!

 

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!