spot_img
spot_img

गणेश मंडळांनो, सामाजिक कामाचा हिशेब तयार ठेवा! डोणगावात ‘गणराया पुरस्कार २०२६’; उत्कृष्ट मंडळांचा नवदुर्गोत्सवात होणार गौरव!

डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नोंदणीकृत गणेश मंडळांसाठी यंदाचा गणेशोत्सव केवळ आरास, रोषणाई आणि मिरवणुकीपुरता मर्यादित राहणार नाही. राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा, सर्वधर्म समभाव आणि सामाजिक बांधिलकी प्रत्यक्ष कृतीतून दाखविणाऱ्या मंडळांची आता थेट दखल घेतली जाणार आहे. त्यासाठी ‘गणराया पुरस्कार २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्हा शांतता समिती, मेहकर तालुका ग्रामीण पत्रकार संघ आणि संजीवनी सेवाभावी परिवार, डोणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जात आहे. पोलीस स्टेशन हद्दीतील नोंदणीकृत गणेश मंडळांनी उत्सवकाळात राबविलेल्या सामाजिक, विधायक आणि जनहिताच्या उपक्रमांची निवड समितीकडून पाहणी केली जाणार आहे. त्यातून उत्कृष्ट ठरणाऱ्या मंडळांना आगामी नवदुर्गोत्सवात ‘गणराया पुरस्कार २०२६’ने सन्मानित केले जाणार आहे.

पुरस्कार वितरण बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या हस्ते होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाला बुलढाणा जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोदबापू देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

राजेंद्र पळसकर, संजय पाटील आखाडे, ठाणेदार गणेश इंगोले, डॉ. गजानन उल्हामाले, डॉ. जमील पठाण, संतोष अवरसर्मोल व गजानन खिल्लारी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या उपक्रमाच्या आयोजनाची धुरा हमीद मुल्लाजी, डॉ. नकुल फुले आणि गजानन चनेवार यांनी सांभाळली आहे.गणरायाच्या उत्सवातून कोणते मंडळ सामाजिक ऐक्याचा खरा आदर्श उभा करते, याकडे आता डोणगाव परिसराचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!