बुलढाणा (हॅलो बुलढाणा) येथील जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेत आर्थिक अनियमितता व गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर उचित कार्यवाही करण्याची मागणी येथील पेट्रोल पंप कर्मचारी संघटनाचे जिल्हाध्यक्ष शेख शगीर शे. नजीर यांनी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बुलढाणाकडे केली आहे.
तक्रारीमध्ये संस्थेच्या विविध आर्थिक व्यवहारांमध्ये आर्थिक अनियमितता, थकीत वसुली, लेखा व्यवहारातील तफावत, बिलांबाबत आक्षेप तसेच मुदत ठेवींच्या व्यवहारासंदर्भात अनियमितता झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, संबंधित लेखापरीक्षण अहवालामध्येही काही आक्षेप नोंदविण्यात आल्याचे तक्रारदाराने नमूद केले आहे. तरी सदर तक्रारीची सक्षम स्तरावर सखोल व निष्पक्ष चौकशी करून, संस्थेचे आर्थिक अभिलेख, लेखापरीक्षण अहवाल, संबंधित बिले, वसुली नोंदी, मुदत ठेवी व इतर संबंधित कागदपत्रांची तपासणी करून तक्रारीतील बाबींची वस्तुनिष्ठ पडताळणी करावी. चौकशीअंती आर्थिक अनियमितता अथवा गैरव्यवहार आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध सहकारी कायदे व नियमांनुसार आवश्यक ती प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शेख शगीर शे. नजीर यांनी केली आहे.
( क्रमशः)












Total Users : 3480899