spot_img
spot_img

BREAKING ज्येष्ठा गौरीपूजनाच्यादिवशी माय लेकांवर काळाचा घाला! कंटेनरच्या जबर धडकेत बाईक चकनाचूर! महिला जागीच ठार तर मुलाची प्रकृती चिंताजनक!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज ज्येष्ठा गौरीपूजनाच्या दिवशी अर्ध्या तासा पहिले येथील धाड मार्गावरील शिवसाई नगर समोर कंटेनर व दुचाकीचा भीषण अपघात झाला.या झालेल्या भीषण धडकेत एक महिला जागीच ठार झाली तर तिच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे.

आनंदाबाई जाधव वय 65 रा. माहोरा कोलापूर असे महिलेचे नाव असून मुलाचे नाव कळू शकले नाही. आज शुक्रवारी साडेअकरा वाजताच्या सुमारास बुलढाणाकडून धाडकडे एमएच 20 जी 77 658 क्रमांकाचा कंटेनर भरधाव वेगाने धाडकडे जात होता. दरम्यान विरुद्ध दिशेने एम एच 21 बी बी 28 42 क्रमांकाच्या दुचाकीवर मुलगा व महिला येत होत्या. दरम्यान धाड मार्गावरील शिवसाई नगर समोर कंटेनरने निष्काळजीपणाने वाहन चालून दुचाकीला भीषण धडक दिली.या अपघातात महिला जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळा
वरून कंटेनर चालकाने पळ काढला होता परंतु त्याला नागरिकांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.सध्या पोलीस कार्यवाही करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!