spot_img
spot_img

MURDER BREAKING! चिखली तालुक्यातील साकेगावच्या तरुणाचे अपहरण; विष पाजून हत्या! किनगाव राजा हद्दीतील तढेगाव शिवारात आढळला मृतदेह; पोलिसांनी काही तासांत उलगडले गूढ, चार आरोपी जाळ्यात!

किनगाव राजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळलेल्या अज्ञात पुरुषाच्या मृतदेहामागील धक्कादायक रहस्य उलगडण्यात बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी या प्रकरणातील चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. संबंधित व्यक्तीचे अपहरण करून त्याला विष पाजत ठार मारल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले आहे.

किनगाव राजा पोलिसांनी या प्रकरणी अपराध क्रमांक ३२६/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश मोतीसिंग राजपूत (रा. उतरादा पेठ), गणेश पुंजाजी काळे (रा. सरस्वती), सागर प्रकाश पवार (रा. उतरादा पेठ) आणि नईम खाँ उमरखाँ पठाण (रा. इसोली) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

दि. ११ सप्टेंबर रोजी किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख पटविणे आणि मृत्यूचे गूढ उकलणे, असे दुहेरी आव्हान पोलिसांसमोर होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगाने तपासाची चक्रे फिरवत मृतकाची ओळख पटवली. त्यानंतर तांत्रिक माहिती आणि गोपनीय तपासाच्या आधारे चार संशयित आरोपींचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले. पुढील चौकशीसाठी आरोपींना किनगाव राजा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन ठोसरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत पीएसआय प्रताप बाजड, एएसआय राजेंद्र अंभोरे यांच्यासह शरद गिरी, जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम आघाव, युवराज राठोड, अमोल अंभोरे, राजेंद्र गडकर, पूजा जाधव, विलास भोसले, राजू आडवे आणि उमेश राजपूत यांनी सहभाग घेतला. हत्येमागील नेमके कारण आणि आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास किनगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय मातोंडकर करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!