spot_img
spot_img

आ. श्वेता महालेंचे आभारातही ‘पलटवार!’ बुलढाणेकरांच्या धैर्याला सलाम करतांना नाव न घेता चिमटे..

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आ.श्वेता महाले यांच्या ऑफिसियल पेजवरून पोस्ट केलेले सलामपत्र ‘हॅलो बुलढाणा’ च्या वाचकांसाठी जसेच्या तसे देत आहोत..

▪️सुजाण बुलढाणेकरांच्या प्रेमाला सलाम!

मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचे खासगी सचिव श्री. विद्याधरजी महाले साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समस्त बुलढाणेकर यांनी जे प्रेम दिले, त्यातून उतराई होणे शक्य नाही!

विशेषतः दहशत करणाऱ्यांनी व्यापारी, छोटे दुकानदार आणि व्यावसायिक यांना “या वाढदिवसाला आणि रॅलीला कोणीही समर्थन करू नये व त्यात सहभागी होऊ नये” असे फोन येऊन सुद्धा, दहशतीला झुगारून ज्याप्रमाणे तुम्ही आमच्या आनंदात सहभागी झाले, या धैर्यासाठी तुम्हाला मनापासून सलाम!

केवळ कागदी शुभेच्छा न देता अनेक व्यावसायिकांनी आणि काही गृहिणींनी देखील, दहशतीच्या या सावलीला भीक न घालता या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या मित्रपरिवारांसाठी चहा, नाश्ता, पाणी याची निःस्वार्थपणे विनामोबदला सेवा दिली.

रॅलीतील प्रचंड संख्या पाहून दूर गाड्या लावलेल्या आणि रॅलीपासून सहकार विद्या मंदिरकडे येण्यासाठी ताटकळलेली अनेक ज्येष्ठ नागरिक व मित्रमंडळ यांना ‘हातावर पोट असणाऱ्या’ ऑटो रिक्षावाल्या माझ्या अनेक भावांनी कोणतेही पैसे न घेता कार्यक्रमस्थळी आणून सोडले! अतिशय छोटा व्यवसाय असलेल्या मोठ्या मनाच्या या दिलदार माणसांचे आभार कोणत्या शब्दात मानावे?

एक मात्र खरे, स्वतःच्या नजरेत मोठे बनलेल्या आणि आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्या कोत्या मनाच्या राजकारण्यांनी, मोठ्या मनाच्या या छोट्या व्यावसायिकांकडून काहीतरी शिकण्यासारखे नक्कीच आहे!

बंधूंनो आणि समस्त बुलढाणेकरांनो, तुमच्या प्रेमाच्या प्रचंड वर्षावात मन भिजून ओतप्रोत झाले आहे. तुमच्या निःस्वार्थ प्रेमाचे आभार मानून परकी होणार नाही!

यापुढे तुमच्या प्रेमाच्या प्रत्येक शब्द व शुभेच्छा यांच्या बदल्यात तुमच्या सर्व समस्या माझ्याच समजून त्या सोडवण्याकरता कार्यरत राहील, ही ग्वाही देतो!

तुम्हा सर्व बुलढाणेकरांना
खूप खूप धन्यवाद!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!