जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) रस्ते विकासाच्या वाहिन्या समजल्या जातात.परंतु स्वातंत्र्याचा 80 वा महोत्सव साजरा झाला तरी आदिवासी बहुल भाग असलेल्या चाळीस टपरी गावात रस्त्या अभावी लोकप्रतिनिधी यांची उदासिनता व कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे आतापर्यंत 4 जणांना जीव गमवावा लागला आहे.यापैकी नुकतेच सादुरी राधेश्याम खरात या गर्भवती महिलेला आपल्या तीन महिन्याच्या बाळासह बांबू आणि चादर ची झोळी करून नेताना श्वास रोखावा लागल्याने संतप्त चाळीस टपरी ग्रामस्थांनी संबंधितावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासह नुकसान भरपाईची मागणी रेटून धरली आहे.या संदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी मार्फतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. सदर घटना ‘हॅलो बुलढाणा’ ने न्यायास्तव उचलून धरली होती हे विशेष!
डिजिटल युगात जळगाव जामोद तालुका दुर्दैवाचा दशावतार म्हणावा लागेल. तालुक्यातील आदिवासीबहुल भागात मूलभूत सुविधा नाहीत. स्वातंत्र्याला 80 वर्ष झाले परंतु चाळीस टपरी गावात विद्युत दिवा लुकलुकला नाही.रस्त्याची तर बातच सोडा.. आरोग्याचा प्रश्न खडतर झाला आहे.मृतक सादुरी राधेशाम खरात यांच्या मृत्युस कारणीभुत असलेल्या मे. शांती कंन्स्ट्रक्शन जी.एच. खंडेलवाल, मे. मंगलम इन्फ्रा (जे.व्ही) अकोला, तसेच कार्यकारी अभियंता प्र.ग्रा.स.यो. म.ग्रा.र.वि.संस्था बुलढाणा यांचे वर कायदेशीर कार्यवाही करुन पिडीत कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी,यासाठी आता ग्रामस्थांचा संताप उसळून आला आहे.विशेष म्हणजे मुख्यमंत्री ग्राम सडक अंतर्गत भिंगारा ते गोमाल 5.25 किमी लांबीचा रस्त्याचे बांधकामाचे शासकीय अंदाजपत्रक 775.84 लक्ष रुपये असून सदर रस्त्याची देखभाल व दुरुस्तीकरीता पुढील दहा वर्षाकरीता किंमत 34.12 लक्ष रुपये अशा आशयाचे कामाची सुरुवात दि.11 ऑक्टो. 2024 रोजी सुरुवात करण्यात येवुन सदर काम दि.10 ऑक्टों. 2026 रोजी पर्यंत पुर्णत्वास नेण्याचे फलक भिंगारा येथील मुळ रस्त्यावर लागलेले आहे. या कामाचे मोठ्या थाटामाटात उदघाटन जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या सुविद्य पत्नी सौ. अपर्णा संजय कुटे यांचे हस्ते करण्यात आले.
परंतु सद्याची परिस्थिती पाहता कामाच्या पुर्णत्वाचा वेळ तोंडाशी आलेला असतांना काहीच हालचाली दिसून येत नाहीत.केवळ उद्घाटन कार्यक्रमात श्रेय घेतल्या गेले असे बोलल्या जाते. त्यामुळे सदर कंत्राटदार यांनी कामात केलेल्या हलगर्जीपणामुळे व कर्तव्यात केलेल्या कसुरामुळे गोमाल व चाळीस टापरी येथील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यातुनच दि.23 ऑगस्ट 2026 रोजी सादुरी खरात या गर्भवती महिलेला तिच्या शेतात सर्पदंश झाल्यामुळे तिला उपचाराकरीता तात्काळ जळगाव जामोद येथे आणण्याकरीता झोळी करून आणताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. याला कंत्राटदार व प्रशासकीय यंत्रणा हे जबाबदार असल्याने व सदर भाग हा आदिवासी बहुल असल्याने अद्यापही कोणत्याही स्वरुपाच्या सुखसुविधा आज पावेतो उपलब्ध नसल्यामुळे यापुर्वी सुध्दा गोमाल या गावात तीन बालकांचा मृत्यु रस्त्या अभावी झाला होता. तरी सुध्दा प्रशासन अजुन
जागे झाले नाही.शासन प्रशासन विकासाच्या खोट्या वल्गना करीत आहेत. दरम्यान सादुरी राधेशाम खरात यांच्या मृत्युस कारणीभुत असलेल्या मे. शांती कंन्स्ट्रक्शन जी.एच. खंडेलवाल, मे. मंगलम इन्फ्रा (जे. व्ही) अकोला, तसेच कार्यकारी अभियंता प्र.ग्रा.स.यो. म.ग्रा.र.वि.संस्था बुलढाणा यांनी अंदाजपत्रकात नमुद केलेल्या तपशीलानुसार रस्त्याचे काम केले असते तर आज सादुरी खरात हिला तिच्या पोटातील बाळासह प्राणास मुकावे लागले नसते व खरात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला नसता. त्यामुळे वरील सर्व कारणांचा व परिस्थितीचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन सदर कंत्राटदाराने
केलेल्या हलगर्जीपणामुळे व कामचुकार पणामुळे नाहक सादुरी खरात हिचा मृत्यु झाला असुन यापुर्वी सुध्दा तिन निष्पाप बालकांचा मृत्यु झाल्यामुळे सदर कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन सादुरी खरात हिच्या कुटुंबाला येणाऱ्या 15 दिवसात नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा समस्त गावकरी लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन करणार असल्याची निवेदन शासन दरबारी पाठविण्यात आले आहे.













Total Users : 3372608