मोताळा (हॅलो बुलढाणा) ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा ₹344.74 कोटी निधी वळविण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून सामाजिक न्याय आघाडीचे बुलढाणा जिल्हा उपप्रमुख तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे मिलिंद गवई यांनी शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
यासंदर्भात गवई यांनी आज मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या नावे जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्यामार्फत निवेदन साद करून सामाजिक न्याय विभागाचा निधी तात्काळ पूर्ववत करण्याची मागणी केली.
“लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही. राज्यातील माता-भगिनींना आर्थिक मदत मिळावी, याचे आम्ही स्वागतच करतो. मात्र, महिलांच्या योजनेसाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या विकासासाठी असलेला निधी वळविणे हा त्या समाजाच्या विकासाच्या हक्कावर परिणाम करणारा निर्णय आहे,” अशी स्पष्ट भूमिका मिलिंद गवई यांनी निवेदनातून मांडली.सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, वसतिगृहे, शैक्षणिक सुविधा, कौशल्य विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि विविध सामाजिक विकासाच्या योजना राबविल्या जातात. त्यामुळे हा निधी इतरत्र वळविल्यास त्याचा परिणाम संबंधित योजनांच्या लाभार्थ्यांवर होण्याची शक्यता असल्याचे गवई यांनी नमूद केले.
“एकीकडे वंचित समाजाच्या विकासासाठी निधी अपुरा पडत असताना दुसरीकडे त्याच विभागाचा निधी अन्य योजनेसाठी वळविणे योग्य नाही. सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र आणि पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा; मात्र सामाजिक न्याय विभागाच्या निधीला हात लावू नये,” अशी मागणी त्यांनी केली.गवई यांनी शासनाकडे सामाजिक न्याय विभागाचा वळविण्यात येत असलेला ₹344.74 कोटी निधी तात्काळ पूर्ववत करावा, भविष्यात सामाजिक न्याय विभागाचा निधी इतर योजनांसाठी वळविला जाणार नाही याबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे, तसेच यापूर्वी निधीचे किती वेळा वळतेकरण झाले याची सविस्तर माहिती अथवा श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशा मागण्या केल्या आहेत.
तसेच निधीचे लेखाशीर्षनिहाय वळतेकरण, मंजुरी आणि प्रत्यक्ष खर्च याबाबतची माहिती जनतेसमोर पारदर्शकपणे ठेवावी आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या हक्काच्या निधीमध्ये कोणतीही कपात किंवा वळतेकरण होणार नाही, याची शासनाने हमी द्यावी, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
“हा प्रश्न कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून वंचित समाजाच्या विकासाच्या हक्काचा आहे. महिलांना मदत द्या, पण त्यासाठी समाजाच्या हक्काचा निधी काढू नका,” असा इशारा मिलिंद गवई यांनी दिला.
शासनाने या मागण्यांची तातडीने दखल घेऊन सामाजिक न्याय विभागाचा निधी पूर्ववत न केल्यास लोकशाही व संविधानिक मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही गवई यांनी दिला.
▪️“लाडकी बहीण योजनेसाठी स्वतंत्र निधी द्या!
सामाजिक न्याय विभागाचा समाजाच्या हक्काचा निधी वळवू नका!” या मागणीसह हे निवेदन साद करण्यात आले यावेळी सामाजिक न्याय आघाडी बुलढाणा जिल्हा उपप्रमुख शिवसेना UBT मिलिंद भाऊ गवई, शहर संपर्कप्रमुख सुनीलभाऊ भाग्यवंत,शहरप्रमुख विजयभाऊ राऊत,मनोजभाऊ चंदन,सामाजिक न्याय आघाडी उपतालुकाप्रमुख श्रीकांतभाऊ जाधव, मनोजभाऊ चंदन महिलाआघाडी तालुकाप्रमुख अनिताताई जाधव,उपतालुकाप्रमुख भावनाताई पाटील, सुनंदाताई खरात ,भारतीताई डागोर,वैशालीताई मिसाळ,शारदाताई दाभाडे, नीताताई चव्हाण, सुवर्णाताई जाधव, रूपालीताई चव्हाण, रोशनीताई गरड, सविताताई राऊत, सुनिताताई दराखे, स्वातीताई लोंढेकर, पूजाताई शिंगणे, सपनाताई इंगळे, शितलताई सुरडकर,वंदनाताई मेढे, ज्योती गायकवाड,गंगाताई काकडे उज्वलाताई हिवाळे, आदी उपस्थित होते











Total Users : 3370677