spot_img
spot_img

घाटबोरीत पालखी सोहळ्यातून सामाजिक एकतेचा संदेश! मुस्लिम बांधवांकडून फळवाटप, वारकऱ्यांकडून शाल-श्रीफळ देऊन सत्कार!

घाटबोरी (हॅलो बुलढाणा/राजेश नवले) घाटबोरी येथून शेगावकडे प्रस्थान करणाऱ्या पालखी सोहळ्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे आणि सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन घडले. मुस्लिम एकता ग्रुप, घाटबोरी यांच्या वतीने पालखीतील वारकरी महिला व पुरुषांना फळवाटप करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी श्रद्धेने आणि आपुलकीने केलेल्या या फळवाटपातून सामाजिक एकतेचा आणि बंधुभावाचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

यावेळी वारकरी संप्रदायाच्या वतीने मुस्लिम बांधवांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगामुळे उपस्थित भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. धर्म वेगवेगळे असले तरी माणुसकी, प्रेम, बंधुभाव आणि परस्पर सन्मान यामुळे समाज अधिक मजबूत होतो, असा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
फळवाटपानंतर हरिभक्त परायण वसंत दांदडे यांच्या वतीने पालखीतील वारकरी तसेच उपस्थित भाविकांसाठी चहा वाटप करण्यात आले. पालखीला निरोप देण्यासाठी गावातील असंख्य महिला-पुरुष, भाविक भक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी घाटबोरी ग्रामपंचायतीचे सरपंच राजकुमार पाखरे, माजी सरपंच गजानन चणेवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजू पाटील नवले, गणेश नवले, बळीराम राठोड, बंडूशेठ वाघमारे, रामभाऊ डोंगरे, मनोज नवले, केशव नवले, वनविभागाचे खुळे साहेब, ज्ञानेश्वर नवले, अशोक आप्पा शंकरवार, गजानन ढोरे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते. मुस्लिम एकता ग्रुपचा प्रेरणादायी सहभाग या सामाजिक उपक्रमात अफसर खान, शेख सत्तार, शेख अमीन, शेख मोबीन, शेख हारुण, शेख जब्बार, शेख सद्दाम, शेख रशीद, शेख सादिक, शेख राजिक, शेख साजिद, याकुब खान, दाऊद खान, फिरोज खान, जुनेद खान यांच्यासह मुस्लिम एकता ग्रुपच्या सदस्यांनी सहभाग घेतला.
“धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच विचारातून सामाजिक एकता अधिक मजबूत होते,” असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून समाजासमोर आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!